नागपूर : अंबाझरी तलावात प्राणवायू कमी झाल्याने असंख्य माशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शेवाळ व जलपर्णी ही वनस्पती माेठ्या प्रमाणात पाण्यातील ऑक्सिजन शाेषून घेते. त्यामुळे माशांना आवश्यक असलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या तलावाच्या पाण्यात तेलाप्रमाणे हिरवी कायी तरंगताना दिसून येत आहे. तलावात अनेक मासे मरून पडल्याचे पर्यावरण प्रेमीच्या लक्षात आल्याने एकाच खळबळ उडाली. स्वामी विवेकानंद यांचे स्मारक असलेल्या ओव्हरफ्लाेच्या पाॅइंटवर पाण्याला हिरवा रंग आल्याचे दिसून आले.
त्यामुळे संपूर्ण तलावाची पाहणी केली असता जास्तीत जास्त ठिकाणी पाण्याला हिरवा रंग आल्याचे निदर्शनास आले. तसेच पाण्यातून दुर्गंधी येत होती. पर्यावरण प्रेमींनी यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती आहे.