Published On : Thu, Sep 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा…; नागपुरात ओबीसी पुन्हा समाज आक्रमक

Advertisement

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती.

ओबीसींची मंत्रालयात येत्या आठ दिवसांत बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतरही सरकारने सकारात्मक पाऊल न उचल्यास सोमवारी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी बेमुदत उपषोण करतील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी दिला.

Advertisement
Today's Rate
Thursday 19 Dec. 2024
Gold 24 KT 76,000/-
Gold 22 KT 70,700/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाणार नाही, अशी लेखी हमी राज्य सरकारने द्यावी. त्यासाठी मंत्रालयात तातडीने ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी.चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहे.

नागपुरातही बेमुदत उपोषण सुरू झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजबांधव सहभागी होतील.सरकारने आम्हाला सात दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही त्यांची मागणी मान्य करीत त्यांना वेळ दिला आहे. अद्यापपर्यंत सरकारकडून चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलेले नाही. किती काळ प्रतीक्षा करायची, यालाही मर्यादा आहेत, असा संताप तायवाडे यांनी व्यक्त केला.

Advertisement