नागपूर:शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी मनपात दाखल होताच थेट “श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ऑपरेशन सेंटर” सीओसी गाठले. श्री. गडकरी यांनी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट, डागा लेआऊट, शंकर नगर, सीताबर्डी, नंदनवन चौक, समता नगर, नंदाजी नगर, भुतेश्वर नगर, वर्मा लेआऊट या भागांमधील पुरपरिस्थितीचा श्री गडकरीजी यांनी आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपायुक्त, सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव श्री संदीप जोशी, माजी महापौर श्रीमती मायाताई इवनाते, माजी नगरसेवक सर्वश्री जितेंद्र (बंटी) कुकडे, संदीप जाधव, वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह आदी उपस्थित होते.