नागपूर : ऑनलाइन गेमिंग’ अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्याची कोट्यवधीची फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळला.
सोंटूच्या वकिलाने सोमवारी सुमारे ६५ मुद्यांसह अतिरिक्त प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे.
उच्च न्यायालयाने ५ सप्टेंबरला सोंटू जैनला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी सायबर पोलिसांना नोटीस बजावून १२ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेशही दिले होते. सोंटूला ८, १0 व १२ सप्टेंबरला सिव्हील लाईन्स, सदर येथील सायबर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अटीनुसार सोंटू लगेच दुबईवरून नागपुरात आला होता. सोंटूने तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी दिली होती. नागपूर पोलिसांनी जैनच्या घरातून २६ कोटी ४0 लाख रुपयांचे घबाड जप्त केले होते. त्यात १२.४ किलो सोने, २९४ किलो चांदी आणि १६ कोटी ९० लाख रोख रकमेचा समावेश आहे.