Published On : Mon, Oct 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

जागतिक पातळीवर महात्मा गांधींचा प्रभाव; पंतप्रधान मोदींनी राजघाटावर वाहिली बापूंना आदरांजली

Advertisement

नवी दिल्ली : आज २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

गांधी जयंतीच्या खास दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की,मी महात्मा गांधींना अभिवादन करतो. त्यांच्या काळातीत शिकवणीमुळे आमचा मार्गातील अंधार दूर झाला.

Today’s Rate
Tues 19 Nov. 2024
Gold 24 KT 75,800 /-
Gold 22 KT 70,500 /-
Silver / Kg 91,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर आहे, जो सर्व मानवजातीला एकता आणि करुणेच्या भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. एकता आणि सुसंवाद वाढण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. त्यांचे विचार प्रत्येक तरुणातील बदलासाठी सक्षम आहेत,असे मोदी ट्विटमध्ये म्हणाले.

दरम्यान देशभरात आज गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी आज स्वच्छता अभियानही राबवले जात आहे. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून कोणत्याही हिंसाचाराला पाठबळ दिले नाही.

Advertisement