नागपूर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्री दरम्यान खामला येथे रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.उदासी दरबार येथे १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत चार दिवसीय रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सिंधी समाजाच्या महिला सहभागी होणार आहेत. हे रास गरबा महोत्सव पूर्णपणे मोफत असून बक्षिसेही दिली जाणार आहेत.त्यात सर्व वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. उदासी दरबारच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात खामल्याच्या प्रसिद्ध नृत्य गटाचे गरबा प्रशिक्षण गुरुसंगत दरबारात वर्षा शंभुवानी यांच्या तर्फे होणार असून 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोंबर पर्यंत संपूर्ण 15 दिवस चालणार आहे. यामध्ये सर्व लहान-मोठे लोक सहभागी होत असून समस्त सिंधी समाजाचे सहकार्य लाभणार आहे. हा कार्यक्रम आदरणीय सिंधी पंचायत व आदरणीय सिंधी पंचायत महिला मंडळ खामला शिवरा ग्रुपचे विनोद जेठानी करत आहेत.