भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात बुधवारी 4 ऑक्टोंबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील सातारा लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व संपर्क से समर्थन अभियानात भाग घेणार आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बुधवारी सकाळी 09.30 वा. सातारा येथील बावधन परिसरात ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 11.00 वा. कनिष्क मंगल कार्यालयात कोरगाव, वाई व सातारा आणि दुपारी 04.30 वा. कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात कराड उत्तर तथा दक्षिण व पाटण विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच विधानसभा क्षेत्रातील ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधतील. दुपारी 01.15 वा. सातारा येथील मोती चौक ते जुने मोटार स्टँडपर्यंत आणि सायं. 06.30 वा. कराड येथील आझाद चौक ते चावडी चौकपर्यंत ‘घर चलो अभियानात सहभागी होतील व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करणार आहेत. यासोबतच ते सातारा व कराड येथील काही महत्वाच्या व प्रतिष्ठीत व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शनही ते घेतील.
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राज्य लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, लोकसभा निवडणूक प्रमुख अतुल भोसले, सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह सर्व स्थानिक खासदार, आमदार व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.