भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवारी 5 ऑक्टोंबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेणार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. गुरवारी सकाळी10.15 वा. तासगाव येथील साने गुरूजी नाट्यगृहात तासगाव-कवठे महांकाळ, जत व खानापूर आणि दुपारी 3.30 वा. मिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये मिरज, सांगली व पलूस-कडेगाव या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधतील. सकाळी 11.45 वा तासगाव येथे गणपती मंदिर ते बागणे चौकपर्यंत आणि सायं. 5.30 वा. मिरज येथे सुरेश खाडे यांच्या कार्यालयापासून ते बालगंधर्व नाटयगृह चौकापर्यंत ‘घर चलो अभियानात सहभागी होतील व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करणार आहेत. यासोबतच ते तासगाव व मिरज येथील काही महत्वाच्या व प्रतिष्ठीत व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत.
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राज्य लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, खासदार संजयकाका पाटील, लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, सांगली लोकसभा समन्वयक शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह सर्व स्थानिक आमदार व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.