नागपूर : हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभियांत्रिकी महाविद्यालयातून घराकडे जात असताना जामठ्याजवळील जंगलात एका गुराख्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून विद्यार्थिनीला अडविले. जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 4 ऑक्टोबरला घडली.या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. हिंगणा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
नागपूर पोलिसांचे 500 कर्मचारी व अधिकारी आरोपीचा शोधात होते. त्या अखेर नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे, यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली.
पीडित २२ वर्षीय तरुणी मूळची यवतमाळची आहे. ती हिंगण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती यवतमाळवरून बसने नागपुरात आली. महाविद्यालय काही अंतरावर असल्यामुळे पायी जात होती. तो भाग जंगलाचा आहे. काही वेळातच एक गुराखी कुऱ्हाड घेऊन पाठलाग करायला लागला. त्याने तरुणीला गाठले आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिला जंगलात नेले. तिच्यावर बलात्कार केला.