Published On : Thu, Oct 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आता मुख्यध्यापकांच्या खांद्यावर नवमतदार नोंदणीची जबाबदारी; नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Advertisement

नागपूर :आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदानाची टक्केवारीत वाढ करणे गरजेचे आहे.

याकरिता मतदार नोंदणीचे काम युद्धस्तरावर करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात मतदार नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करा.

Gold Rate
03 April 2025
Gold 24 KT 91,900 /-
Gold 22 KT 85,500 /-
Silver / Kg 98,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

७५ हजार नवमतदारांची नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी जबाबदारी घेऊन नवमतदारांची नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केल्या.

सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व बीएलओंसोबत मतदार नोंदणी विषयक आढावा बैठक वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रविण महिरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement