नागपूर: अमृता वाहिनी आल्या ….त्यांनी गरबा नृत्य केले आणि संपूर्ण राणाप्रताप नगर अर्थात टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, सेंट्रल एकसाइज कॉलनी, गावंडे ले आउट आणि रवींद्र नगर ,दीनदयाल नगर, गणेश कॉलनी , शांतिनिकेतन कॉलनी ह्या पंचक्रोशी च्या नागरिकांना जिकून घेतले . प्रचंड टाळ्या आणि घोषणा आणि गरब्याच्या तालावर प्रख्यात गायिका, सोशल वर्कर आणि बँकर सौ अमृता फडणवीस (मा. उप- मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सौभाग्यवती ) ह्यानी जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर नवरात्रोत्सव अंतर्गत आयोजित रास गरबा कार्यक्रमात आज स्वत; भाग घेतला आणि उपस्थित सर्व महिला, आणि युवा वर्गाची मने जिंकून घेतली.
जय दुर्गा उत्सव मंडळ च्या महिला कार्यकर्त्या सौ अंजली लोहट , सौ दीपा चौधरी , सौ स्मिता द्रवेकर, सौ वर्षा मुदलियार, , सौ जयश्री चौधरी , सौ आरती वानखेडे , सौ वर्षा चौधरी, सौ प्रियांका गुप्ता , सौ प्रिया ब्रम्हे , सौ प्रांजली नजपांडे, सौ पूनम मिश्रा, सौ दिपा गवळी, सौ दर्शना दुरूगकर, सौ प्रिया कनोजिया, सौ माधुरी रोकडे आणि सुश्री संगीता कनोजिया, जान्हवी लोहट आणि मानसी लोहट ह्यांनी औक्षण करून अमृता फडणवीस ह्यांचे स्वागत केले तसेच भल्या मोठा कमळ हार घालून सत्कार देखील केला. ह्या प्रसंगी माजी नगरसेवक श्री दिलीप दिवे, श्री दिलीप चौधरी, आणि सौ वर्षा दिलीप चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होत्या. जय दुर्गा मंडळ च्या पुरुष कार्यकर्त्यांनी देखील भला मोठा कमळ पुष्पहार ने अमृता फडणवीस ह्यांचे स्वागत केले.
अमृता फडणवीस ह्यांनी या प्रसंगी बोलताना हजारो च्या संख्येने उपस्थित नागरिकांना आणि रास गरबा कार्यक्रमात उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या आणि दरवर्षी ह्याच टेलिकॉम नगर गरबा कार्यक्रमात येण्याचे तसेच गरबा खेळण्याचे आश्वासन देखील दिले.
जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर, गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा नवरात्री उत्सव साजरा करीत आहे.
फक्त नवरात्री उत्सव च नव्हे तर २०२२-२३ ह्या वर्षभर कालावधीत जय दुर्गा उत्सव मंडळ तर्फे वर्षभर विविध सामाजिक तसेच कार्यक्रम राबविण्यात आले, ज्या मध्ये जागतिक महिला दिन आणि टेलिकॉम नगर मधील वरिष्ठ महिलांचा सन्मान कार्यक्रम, गुढी पाडवा निमित्य महिलांची स्कूटर रॅली, तसेच सर्वासाठी शेगाव तीर्थाटन यात्रा इ .