Published On : Mon, Oct 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दीक्षाभूमीवर तब्बल २५ हजार लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेणार

Advertisement

नागपूर : 14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.यंदा नागपुरात तब्बल २५ हजार लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.दीक्षा घेणारे हे अनुयायी केरळ व कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती आहे.

दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी हजारांहून अधिक लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यात राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यातील लोकांचा समावेश आहे.

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मविजय, भंते महानाग, भंते धम्मप्रकाश यांच्याकडून विविध राज्यातील अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली जात आहे. याशिवाय जपानमधील २० उपासक आज श्रामणेर दीक्षा घेणार असल्याची माहिती आहे.

Advertisement