नागपूर: देशभरात विजयादशमीला रावणाचे दहन करून ती उत्साहात साजरी केली जाते. नागपुरात रावण दहनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सनातन धर्म युवक सभेतर्फे गेल्या ७२ वर्षांपासून रावण दहनाचा कार्यक्रम सातत्याने होत आहे. यानिमित्त रामलीला सादर केली जाते. प्रभू श्रीराम, सीता, हनुमानाच्या वेशभूषा बच्चेकंपनीकडून केल्या जातात.
जय श्रीरामाचा गजर केला जातो. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. सनातन धर्म युवक सभासनातन धर्म युवक सभेतर्फे ६८ वा रावणदहन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कस्तूरचंद पार्कवर भव्य रावण, मेघनाथ व कुंभकर्णाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. दुपारी ४ पासून रावण दहनाच्या विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी रामलीला सादर करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण झाले.भव्य आतषबाजी करण्यात आली.
विजयादशमीला रावणाचे दहन करून हा विजय उत्सव साजरा केला जातो. मर्यादा पुरुषोत्तम राचंद्रांनी रावणाच्या तावडीतून सीतेची मुक्तता केली आणि युद्धात रावणाचा वध केला. तेव्हापासून विजयादशमीला रावणाचे दहन केले जाते.