नागपूर : नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने दुर्गा देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे झोनस्तरावर कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार लहान आकारांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी झोनस्तरावर तर मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथील कृत्रिम तलावामध्ये व्यवस्था करण्यात आली.
झोन स्तरावरील आणि कोराडी येथील कृत्रिम तलावामध्ये एकूण १८५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. सर्व विसर्जन स्थळी मूर्ती विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनाची देखील व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आलेली आहे. नागपूर शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर या झोनमध्ये कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली.
या कृत्रिम तलावांमध्ये ४ फुट अथवा त्यापेक्षा लहान आकारांच्या ९५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर कोराडी येथील विशाल कृत्रिम तलावामध्ये ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या ९० मूर्तींचे विजर्सन करण्यात आले. बुधवार २५ ऑक्टोबर पर्यंत एकूण १८५ मूर्तींचे विसर्जन झालेले आहे.
झोननिहाय मूर्ती विसर्जन
लक्ष्मीनगर झोन – २५
धरमपेठ झोन – ४५
धंतोली झोन – १५
नेहरूनगर झोन – १०
कोराडी कृत्रिम तलाव – ९०
एकूण – १८५