Published On : Mon, Oct 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरच्या अगोदर घ्या; सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फाटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आज पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले आहे. आम्ही निकाल देऊन इतके दिवस झाले आहेत तुम्ही काहीही निर्णय का घेतला नाहीत? असा संतप्त सवाल न्यायालयाने नार्वेकरांना विचारला. तसेच एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या असे निर्देश देत सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी त्यांना दिले. राहुल नार्वेकरांच्या वतीने तुषार मेहतांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी वेळ वाढवून मागितला. मात्र वेळ वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मागील सहा महिन्यात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी कोणतीही घडामोड घडली नाही. विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी फक्त चालढकल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देत एक प्रकारचा थेट अल्टिमेटमच सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन पाळली नाहीतर मात्र सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चिच तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता आहे.

Advertisement