नागपूर : कामठी :- विदर्भातील सर्वात मोठे उपजिल्हा रुग्णालय म्हणून कामठी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयाचा नुकताच विस्तार करून 50 बेड खाटाहून 100 खाटाचे रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. मात्र या रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या बहुधा महिलांना प्रसूती (सिजेरियन) शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपूर च्या डागा वा मेयो रेफर करावे लागत होते. ज्यामुळे नागरिकांत रुग्णालयाच्या रेफर टू नागपूर’ या पद्धतीला कंटाळून स्थानिक आरोग्य विभागाविषयी रोष वाढीवर होता. ही बाब वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना धुपारे यांच्या निदर्शनास येताच रुग्णसेवेसाठी उपयुक्त असे महिलांची प्रसूती वा शास्त्रक्रिया गृहासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह शासनस्तरावर प्रयत्न केले, जेणेकरून रिफर टू नागपूर पद्धतीला ब्रेक लागावा.
यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांनी महिलांची प्रसूती व शस्त्रकोया (सिजर) बाब गांभीर्याने लक्षात घेत या बाबीकडे विशेष पाठपुरावा करून राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याकडे केलेल्या आग्रहास्तव राष्ट्रीय आरोग्य अभियानातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत कामठी च्या शासकीय उपजिल्हाप्रती तसेच कियागृह अधिकाम करण्यासाठी दोन कोटी आठ लक्ष ३० हजार रुपये मंजूर करण्यात त्यानुसार कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयास प्रसूती कक्ष तसेस शस्त्रक्रिया साठी दोन कोटी आठ तक 30 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार टेकचंद सावरकर यांनी दिली.
मंजूर झालेल्या या दोन कोटी रूपयाच्या निधीतून अद्यावत असे शस्त्रक्रिया गृह राहणार असून महिलांच्या प्रसूती तसेच सिजेरियनचे वेगळे वार्ड राहणार आहे. त्यात डॉक्टर व कर्मचारी करिता चेंजिंग रूम सह इतर आवश्यक गोष्टी राहणार आहेत तसेच ही सर्व कामे राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या माध्यमातून होणार आहेत.
बरेचदा महिलांना प्रसूतीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता सिजर च्या नावाखाली ‘रेफर टू नागपूर ‘ हे नित्याचेच झाले होते बोटावर मोजणारेच सिजर प्रसुती व्हायच्या नाही तर नागपूर ला रेफर करीत असल्याने त्यावेळच्या मानसिकतेत डोकेदुखी वाढत होती. त्यामुळे ही पद्धत बंद होऊन ती सोय याच रुग्णालयात व्हावी अशी मागणी नागरिकांची होतो .
यामुळे याला प्राथमिकता देऊन वैद्यकीय अधिक्षिका यांनी पुढाकार घेत संबंधित आमदार व आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त करून मागणी केली होतो अखेर या मागणीला आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रयत्नातून यश लाभले व प्रसूती तसेच शस्त्रक्रियेच्या अद्यावत साठी कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालय साठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे नागरिकांची रेफर टू नागपूर पद्धत बंद होणार असल्याने नागरिकातर्फे आमदार टेकचंद सावरकर तसेच शासनाचे आभार मानण्यात येत आहे.