अंमली पदार्थ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीश ३ पी. वाय. लाडेकर यांनी निर्णय दिला. आरोपीतर्फे ॲड. आर. के. तिवारी व ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.
गणेश श्यामसुंदर यादव आणि रमेश श्यामसुंदर यादव अशी निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरती रमेश यादव असे मृत महिलेचे नाव आहे. २२ ॲागस्ट २०११ ला आरतीसोबत मारहाण करून तिच्यावर केरोसीन ओतून जाळण्यात आले. उपचारादरम्यान आरतीचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी पोलिसांनी तिचा जवाब नोंदवला होता. यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींशिवाय त्यांची आई केसरबाईही आरोपी होती. केसरबाई यांचा खटल्याची सुनावणी सुरू असताना मृत्यू झाला. सरकारी पक्षाने एकूण ६ साक्षीदार तपासले. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.