Published On : Tue, Nov 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मोमीनपुरा गोळीबार प्रकरण; नागपूर पोलिसांकडून मोठे जाळे उघड,पिस्तुल पुरवणाऱ्या आरोपींकडून ९ पिस्तूलांसह ८४ जिवंत काडतूस जप्त !

नागपूर : काही दिवसांपूर्वी प्रापर्टीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊसमध्ये घडली. जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा असे खून झालेल्या गेस्ट हाउस मालकाचे नाव आहे. मोहम्मद परवेज सोहेल मोहम्मद हारून (२४) रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा, आशिष सोहनलाल बिसेन, सलमान खान समशेर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद परवेज याला पिस्तुल विकणारा कुख्यात शस्त्र विक्रेता फिरोज खान याला गांधीबाग तहसील पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी फिरोज खान यांची कसून चौकशी केली असता त्याने पिस्तुल इमरान आलम नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. इमरान हा मध्यप्रदेश येतील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहे. या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांचे एक पथक बालाघाटला रवाना झाले. यानंतर इमरान आलम याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान इमरान आलम हा फिरोजला बऱ्याच काळापासून शस्त्र पुरवत असल्याची माहिती समोर आली. दोघांच्याही घराची आणि पिस्तुल लपविलेल्या ठिकाणाची झडती घेतली असताना पोलिसांनी एकंदरीत ९ पिस्तूल आणि ८४ जिवंत काडतूस जप्त केले आहे.आरोपी फिरोजने अजूनही अनेक गुन्हेगारांना शस्त्र पुरवठा केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती झोन 3 चे डीसीपी गोरख भामरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान जमील अहमद यांचे तहसिल पोलीस ठाण्याअंतर्गत रहमान चौक, मोमीनपुरा येथे तीन माळ्यांची इमारतीत अल करीम या नावाने गेस्ट हाऊस चालवायचे. यासोबतच प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसायही करीत होता. याच व्यवसायातून आरोपी मोहम्मद परवेज याच्यासोबत ओळख झाली. मागील सहा वर्षांपासून ते मिळून संपत्ती खरेदी विक्रीच्या व्यवसाय करीत होते. गेल्या काही दिवसांपासून जमील आणि आरोपी परवेज यांच्या प्रापर्टी खरेदी विक्रीवरून वाद होता. आरोपी परवेज त्याच्या दोन साथीदारासह गेस्ट हाऊसमध्ये आला. त्याने जमीलशी वाद घातला आणि थेट पिस्तूल काढून जमील यांच्या डोक्यात गोळी झाडली. गेस्ट हाउसमध्ये प्रचंड खळबळ उडाली. माहिती मिळताच तहसिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे.

Advertisement