नागपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सीताबर्डी मेन रोडवरील फेरीवाल्यांच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही कारवाई करण्यात येत असल्याने फेरीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
आज मंगळवारी दुपारी पुन्हा अतिक्रमणचे पथक सीताबर्डीत धडकताच संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी कारवाईच्या विरोधात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरु केले. हे आंदोलन आजही सुरुच आहे. हे पाहता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पावर असलेल्या फेरीवाल्यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आयुक्तांनी फेरीवाल्यांना आंदोलन मागे घेण्याच्या सूचना दिल्या.
फेरीवाल्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत संताप व्यक्त करत आहे. यामुळे सीताबर्डी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सणासुदीच्या काळात व्यवसाय करण्यासाठी सर्व फेरीवाल्यांची कर्ज काढून माल भरला आहे. हे पाहाता महानगरपालिकेच्या अतिक्रमक कारवाईमुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.