Published On : Thu, Nov 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दिवाळीनिमित्त घराची साफ सफाई करताना अंगावर कपाट कोसळून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू !

Advertisement

नागपूर : दिवाळीसणानिमित्ताने घराची साफसफाई करताना एका कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. नागपुरातील माधवनगरीच्या इसनानी भागात राहणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलीच्या आंगणावर लाकडाचे कपाट पडून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना घडताच तातडीने गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ईकविरा राजेश गहलोत असे या चिमुकलीचे नाव आहे ऐन सणासुदीच्या काळात अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजेश गहलोत हे राजस्थानचे असून कामानिमित्त नागपुरात आपल्या कुटुंबासह राहतात. दिवाळीची साफ सफाई करत असताना त्यांनी घरातील चपला ठेवण्याचे जुने लाकडी कपाट घराबाहेर ठेवले होते इकवीरा घरातील अंगणात खेळत होती.

Today’s Rate
Saturday 23 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खेळता-खेळता ती कपाटाजवळ आली आणि कपाट तिच्या अंगावर पडले.कपात जाड असल्याने ईकविरा त्याखाली दाबल्या गेली. तिला तातडीने रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Advertisement