Published On : Sat, Nov 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८० प्रकरणांची नोंद

- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवार ( ता. 10) रोजी उपद्रव शोध पथकाने ८० प्रकरणांची नोंद करून ५८,३०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १५ प्रकरणांची नोंद करून ६,००० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून १६०० रुपयांची वसुली करण्यात आली.

तर मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगलकार्यालय, कॅटरस, सर्व्हीस प्रोव्हायडर आदींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा आशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १८ प्रकरणांची नोंद करून २८,५०० रुपयांची वसुली करण्यात आली.

याशिवाय सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा/साठवणे, प्रथम अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून रु १००० दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २४ प्रकरणांची नोंद करून रु ४८०० दंड वसूल करण्यात आला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १२ प्रकरणांची नोंद करून रु १२,००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement