नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखण्यासाठी पालिका प्रशासन दक्ष झाले. या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, घाण केल्यास, लघुशंका अथवा शौच केल्यास जागेवरच दंड आकारण्याचे अधिकार पालिकेला आहेत. या अधिकारांचा वापर करून पालिकेचे उपद्रव शोधपथक कमला लागले आहे.
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ८० लोकांवर शुक्रवारी कारवाई करून ५८,३०० रुपयाचा दंड वसूल केला. तर हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते अशा १५ लोकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
ज्या व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्याने ४ लोकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी ४ लोकांवर कारवाई करून १६०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली.वाहतुकीचा रस्ता अडविल्या प्रकरणात १८ लोकांवर कारवाई करून २८,५०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली. बांधकामाचा मलबा टाकल्याने एकावर कारवाई करून १ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.