नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नामदेवराव जाधव यांनी गंभीर आरोप केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाधवविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नागपुरातही त्याचे पडसाद उमटले आहे. नामदेवराव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन गुन्हा नोंद करावा अशी मागणी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरद पवार गट) शुक्रवारी नंदनवन पोलीस ठाण्यात करण्यात आली.
शहर अध्यक्ष दुनेश्र्वर पेठे यांच्या नेतृत्वात ही तक्रार करण्यात आली. मराठा व ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाधव हे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर करत आहेत. हे पाहता जाधव यांच्यावर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, असे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान तक्रार दाखल करताना या यावेळी रमण ठवकर, प्रशांत बनकर, धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, मिलिंद वाचनेकर, कादिर शेख, रुपेश बांगडे, विनय मुदलियार, नथुलाल दारोटे, रियाज शेख, सुशांत पाली, अमित जेठे, नमोहर निखार, हर्षल खडसकर, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.