Advertisement
नागपूर : शहरात काल दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र यादरम्यान नागपुरात फटाक्यांमुळे ११ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यातील चार जण हे ११ वर्षांखालील असून जखमींवर उपचार सुरु झाले आहेत.
लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने रविवारीही शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. मात्र यामुळे अनेकांचे मोठे नुकसानही झाले आहेत. या फटाक्यांमुळे अनेक जण भाजले तर काहींना किरकोळ इजा झाली आहे, अशी माहिती शहरातील मेडिकल रुग्णालयात देण्यात आली. तर अनेक खाजगी रुग्णालयातही फटाक्यांने जखमी झालेल्यांची नोंद करण्यात आली आहे.