मुंबई : केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील चार प्रमुख शहरातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्ह एकदा कमी झाल्या आहेत. या किंमती कालपासूनच लागू झाल्या आहेत.
दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 57.50 रुपयांनी स्वस्त झाले. आता 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमती दिल्लीत 1775.50 रुपये झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी हा भाव 1833 रुपये होता. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पण किंमती कमी झाल्या आहेत. कोलकत्तामध्ये 1885.50 रुपये, मुंबईत 1728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1942 रुपये झाली आहे.
1 नोव्हेंबर रोजी हा भाव कोलकत्तामध्ये 1943 रुपये, मुंबईत 1785.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपये होता. तत्पूर्वी 1 नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती 103 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. 1 नोव्हेंबरलाही 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान 30 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. त्यानंतर 200 रुपयांनी घट झाली. उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांसाठी सबसिडी 200 रुपयांवरून 400 रुपये करण्यात आली आहे.