Published On : Sat, Dec 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

राजकारणातील सगळेच व्यक्ती असुर नसतात ; एकनाथ शिंदेंचे विधान

Advertisement

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडीना वेग आला आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणावर मोठे विधान केले. राज्यात राजकीय प्रदुषण वाढले असून राजकारणातील सगळेच व्यक्ती मात्र असुर नसतात, असे शिंदे म्हणाले आहेत.नागपुरात आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.

गडकरी यांच्यासारखे नेते राजकारणातील प्रदुषण हलकेफुलके बोलून दूर करण्याचा प्रयत्न करतात. ते दर्दी खवय्ये असले तरी त्यांचे बोलणे हे सावजी रस्स्यासारखे झणझणीत असते. त्यांचा आग्रह आमच्यासाठी प्रेमाचा आदेश असतो. केवळ मेट्रो, पायाभूत सुविधा या विकासात्मक बाबींकडे लक्ष न देता राज्याची परंपरा व संस्कृतीदेखील जपणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक कलावंतांना मंच प्रदान करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement
Wenesday Rate
Friday 27 Dec. 2024
Gold 24 KT 76,800/-
Gold 22 KT 71,400/-
Silver / Kg 89,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एकीकडे कलाकार-गायक पियुष मिश्रा यांनी गाण्यातून राजकारणावर हळूवार प्रहार केले. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी थेटच प्रदुषणाच्या मुद्द्यावर फटकेबाजी केली. मी व उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचे सूर एकच आहेत. नागपुरचे सुपूत्र नितीन गडकरी व फडणवीस हे दोघेही चांगले कलाकार आहेत.राजकारणात सारेच असूर नसतात.
काही यांच्यासारखी सुरेल माणसेदेखील असतात.

Advertisement