मुंबई : राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरामच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने विजयाचा झेंडा फडकावला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली., मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले. मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी,असेही ठाकरे म्हणाले आहेत.
शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीकेची झोड उडवली.
मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. आमच्याही मनात काही शंका नको.एक्झिट पोलचे निकालही खोटे ठरत आहेत. नेमके हे कसे घडले, असा प्रश्नही जनतेला पडला आहे, असेही ठाकरे म्हणाले.