मुंबई : कांदा निर्यातबंदीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.या निर्णयाविरोधात स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई-आग्रा रोडवर चांदवडमध्ये (chandwad) शरद पवारांनी शेतकऱ्यांसह रास्ता रोको केला.
आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडली आहे, रास्ता रोको केल्याशिवाय या दिल्लीला कळत नाही. रास्तो रोकोतून केंद्र सरकारला संदेश दिला आहे आता उद्या दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे पवार म्हणाले.
कांदाप्रश्ना शरद पवार यांनी रास्ता रोको आंदोल केल्यानंतर पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही अशी टीका शरद पवार यांनी केली. कांद्याचे दर वाढताच निर्यात बंदी केली जाते, सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार आहे की नाही, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, शरद पवारांच्या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.