नागपूर : शहरातील अमरावती रोड येथील चोकर धानी राजस्थानी व्हिलेज रिसॉर्ट ऍण्ड रेस्टारेंटमधील अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात जवळपास जवळपास 80 लोकांना विषबाधा झाली असून त्यांची प्राकृती बिघडल्याची माहिती आहे.अन्नातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले.
माहितीनुसार, वर्धमान नगर येथील रहिवासी कैलास धनराज बत्रा यांच्या मुलाच्या दोन दिवसीय सगाई व लग्नाचा कार्यक्रम चोकर धानी येथे 9 व 10 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये 500 लोक सहभागी झाले होते. 10 डिसेंबर रोजी रात्री जेवल्यानंतर वाटिका लॉनमध्येच काही लोकांना उलट्या होऊ लागल्या, मात्र रात्री 2 वाजण्याच्या सुमारास परिस्थिती आणखीनच बिकट झाली.लग्न आटोपून जे लोक आपापल्या खोलीत गेले होते, त्या सर्वांना हाच त्रास होऊ लागला.
चोकर धानी रेस्टारेंट हे मुख्य शहरापासून थोडे दूर असल्याने सर्वांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधला व इव्हेंट मॅनेजमेंटच्या लोकांनी औषधे दिली.आतापर्यंत 80 जणांच्या आजारपणाची बातमी आली आहे. काही लोकांची प्रकृति इतकी खराब झाली की त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बत्रा कुटुंबियामधील एकूण 7 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. याप्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती कैलास बत्रा यांनी दिली आहे.
दरम्यान याअगोदर 2 आणि 3 डिसेंबर रोजी चोकर धानी येथील जरीपटका येथील रहिवासी आहुजा कुटुंबाच्या लग्नात 100 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती.