Published On : Thu, Dec 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची शिवरायांच्या पुतळ्यासमोर विष प्राशन करून आत्महत्या !

छत्रपती संभाजीनगरातील घटना

छत्रपती संभाजीनगर: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. तर दुसरीकडे एका ३९ वर्षीय मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना छत्रपती संभाजीनगरायेथील फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे घडली. विजय पुंडलिक राकडे रा. खामगाव (गोरक्ष) फुलंब्री असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एका चिठ्ठीवर मजकूर लिहिला होता.

विजय याने चिठ्ठीत लिहिले की, माझ्या मुलांना मुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यासाठी मी काही करू शकत नाही.येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला होता. दरम्यान ही बाब लक्षात येतात नातेवाईकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत विजय राकडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement