नागपूर : नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेल्या सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या स्फोटात ९ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात मोठी जीवितहानी झाल्याची माहिती. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरू करण्यात आला आहे,अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली.मृतांमध्ये ६ पुरुष तर ३ महिलांचा समावेश असल्याचे कळते.
नागपुरातील घटना अतिशय दुर्दैवी मृतकांच्या वारसांना 5 लाखांची मदत– देवेंद्र फडणवीस नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याचे फडणवीस म्हणाले.