नागपूर :महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 4800 हून अधिक नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतीची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
विधानसभेत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रश्नांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत उत्तर दिले.महाराष्ट्रात यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 4,872 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाळांचे वय जन्मापासून केवळ 28 दिवसांचे होते. दररोज सरासरी 23 मुलांचा मृत्यू होतो. मुंबई, ठाणे, सोलापूर, अकोला आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बालकांचा मृत्यू झाला आहे.4,872 मृत्यूंपैकी 16 टक्के म्हणजेच 795 बालकांचा मृत्यू श्वसनाच्या समस्येमुळे झाला आहे.
अर्भकांच्या उपचारासाठी 52 केंद्रे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व आजारी बालकांना शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत औषधे, चाचण्या आणि वाहतूक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवजात मृत्यू दरात घट झाली , परंतु…
देशातील नवजात मृत्यूदरात सातत्याने घट होत आहे. 2019 मध्ये ते प्रति 1000 जन्मांमागे 22 होते, जे 2020 मध्ये वाढून 1000 जन्मामागे20 प्रति इतके झाले . म्हणजेच 2019 मध्ये भारतात दर 1000 मुलांपैकी 22 बालकांचा जन्मानंतर मृत्यू झाला, 2020 मध्ये हा आकडा 20 झाला. बालमृत्यू दर शहरी भागात दर हजारी 12 आणि ग्रामीण भागात 23 प्रति हजार आहे.
युनिसेफच्या अहवालानुसार, जगात एका वर्षात जन्मलेल्या एकूण 25 दशलक्ष मुलांपैकी सुमारे एक पंचमांश मुले भारतात जन्मतात. यातील एका बाळाचा दर मिनिटाला मृत्यू होतो. अहवालानुसार, 1990 मध्ये नवजात मृत्यूंमध्ये भारताचा वाटा जगातील नवजात मृत्यूंपैकी एक तृतीयांश होता, आज तो एक चतुर्थांश पेक्षा कमी आहे. 1990 च्या तुलनेत, 2016 मध्ये भारतात दर महिन्याला अंदाजे 10 लाख नवजात मृत्यूमध्ये घट झाली आहे.