नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतर मागास प्रवर्गासाठी पीएम आवास (PM Awas) घरकुल योजनेंतर्गत 10 लाख घरे 3 वर्षांत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
मागास प्रवर्गासाठी (OBC) जिल्हानिहाय 72 पैकी 52 वसतीगृहे महिनाभरात सुरू होत आहेत. प्रति जिल्हा 100 मुली व 100 मुले असे 7200 मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.धनगर समाजासाठी 10 हजार घरकुले बांधतो आहोत. 2 हजार 888 लाभार्थ्यांना लाभ दिला.
नगर समाजाच्या उन्नतीकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन झाली आहे. धनगर बहुल जिल्ह्यांमध्ये धनगर समाजातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत, असेही शिंदे म्हणाले.