नागपूर: संपूर्ण देशात हलाल आणि झटका मांस यावरून वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील केएफसी आउटलेटमध्ये येणाऱ्या लोकांना हलाल मांस दिल्याचे समजल्यावर ग्राहकांनी हलाल मांस खाण्यास नकार देत प्रचंड गोंधळ घातला.एवढेच नाही तर केएफसीने आउटलेटमध्ये बसलेल्या ग्राहकांना पैसे परत केले.
हा प्रकार माटे चौकातील केएफसी आऊटलेटमध्ये घडला.KFC देशभरात हलाल फूडची विक्री करते. याची माहिती मिळताच राष्ट्रीय युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल पांडे यांनी ही बाब लोकांच्या निदर्शनास आणून दिली. तेथे जेवायला आलेल्या ग्राहकाला त्याने हा प्रकार सांगितला, मात्र ग्राहकाने हलाल खाण्यास नकार दिला. या प्रकारानंतर तेथील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
यानंतर केएफसीने हे प्रकरण दाबण्यासाठी ग्राहकांना पैसे परत केले.KFC देशभरात हलाल खाद्यपदार्थांची विक्री करते. पण केएफसी फक्त पंजाबमध्ये झटका मांसापासून बनवलेले खाद्यपदार्थ विकते. यासोबतच KFC च्या कस्टमर केअरने देखील पुष्टी केली की झटका मांस फक्त पंजाबमध्ये विकले जाते, याशिवाय देशभरात फक्त हलाल मांस पाठवले जाते.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचाही हलाला मांसाला विरोध-
याआधी 17 डिसेंबर रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी हिंदूंना हलाला मांस खाणे बंद करण्याचा आग्रह धरला होता. हिंदूंनी हलाला मांस खाण्यावर बंदी घालावी आणि फक्त ‘झटका’ मांस खावे, असे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या बेगुसराय लोकसभा मतदारसंघात यासाठी आवाहन केले होते आणि यापुढे हलाल मांस खाऊन आपला ‘धर्म’ भ्रष्ट करणार नाही, अशी शपथही त्यांनी समर्थकांना दिली होती. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, मी त्या मुस्लिमांचे कौतुक करतो ज्यांनी फक्त हलाल मांस खाण्याचा निर्णय घेतला आहे. आता हिंदूंनीही त्यांच्या धार्मिक परंपरांशी अशीच बांधिलकी दाखवली पाहिजे.