Published On : Fri, Jan 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महिलेचा पाठलाग करणे म्हणजे विनयभंग नाही -मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण

Advertisement

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक निर्वाळा दिला आहे. महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि सायकल चालवताना ढकलणे, हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

माहितीनुसा, एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्धा येथे एफआयआर दाखल केला होता की, ती सायकलवरून बाजारात जात असताना मोहम्मद एजाज शेख इस्माईलने तिचा पाठलाग केला. नंतर त्याने तिला शिवीगाळ केली व ढकलले. इस्माईलने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता.

Today’s Rate
Tuesday 12 Nov. 2024
Gold 24 KT 75,900 /-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 90,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वर्धा न्यायालयाने इस्माइलला ३५४ आयपीसीअंतर्गत विनयभंग केला म्हणून दोषी ठरवत शिक्षा दिली. सत्र न्यायाधीशांनी शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळले म्हणून इस्माईलने उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपीने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला किंवा शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला धक्का दिला, ज्यामुळे तिला लज्जा वाटली, हे मुलीने सांगितले नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

महिलेचा पाठलाग करणे, शिवीगाळ करणे त्रासदायक ठरू शकते. मात्र, त्यामुळे तिच्या शीलतेला धक्का पोहोचला, असे म्हणता येणार नाही. तिला अयोग्यरित्या स्पर्श झाल्याचे समोर आलेले नाही. सदर पुरुषाने आपल्या शरीराच्या विशिष्ट भागाला धक्का दिल्याने आपण लज्जास्पद परिस्थितीत आल्याचेही पीडित तरुणीने नमूद केलेले नाही. तिच्या शरीराला धक्का लागला, हे सिद्ध झालेले नाही.म्हणून हे कृत्य विनयभंग ठरत नाही, असे मुंबई हायकोर्टाचे नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे म्हणाले.

Advertisement