Advertisement
नागपूर : उप्पलवाडी परिसरात असलेल्या बर्फाच्या कारखान्यात शनिवारी सायंकाळी स्फोट होऊन एक कर्मचारी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्फाच्या कारखान्यातील बॉयलरमध्ये साठवलेल्या अमोनिया गॅसमुळे हा स्फोट झाला.स्फोटानंतर वायू परिसरात पसरल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे.