Published On : Tue, Jan 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात १३ जानेवारीपासून 3 दिवस ‘जाणता राजा’ महानाट्यांचे आयोजन

नागपूर : राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ नागपूरकरांच्या भेटीला येत आहे.13, 14, व 15 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियमवर प्रयोग होणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या राज्य शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील पहिला राज्यव्यापी प्रयोग राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात होणार आहे.

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी तसेच महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या संदर्भात नियोजनाची बैठक पार पडली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार इतिहासकार शिवशाहिर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर 30 हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे.यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
दरम्यान दररोज सायंकाळी साडेपाच वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार या महानाट्याचे माध्यमातून आपली कला सादर करणार आहे.

Advertisement