अयोध्येत श्री राम मंदिरात प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना होत असतानाच मध्यभारतातील देवस्थान श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी मंदिरात ६००० किलोचा रामहलवा तयार करून आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
कोराडी मंदिरात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, भारतवासीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्राची अयोध्येतील भव्य मंदिरात मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरातील सर्व मंदिरात धार्मिक कार्ये होतील. कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात पुरातन राम मंदिर व नव्याने उभारण्यात आलेले रामायण सांस्कृतिक केंद्र असल्याने येथेही धार्मिक आयोजनासह ६००० किलोचा रामहलवा तयार करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या राम हलव्याची रेसिपी तयार केली असून सकाळी ६.३० वाजतापासून सकाळी ११.३० हा हलवा शिजविला जाणार आहे. त्यानंतर १२.०० वाजतापासून वितरित करण्यात येणार आहे.
६०० किलो रवा, ६०० किलो तूप, ८०० किलो साखर, २०० किलो सुखा मेवा व ५० किलो मसाला व पाण्याचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी १५ फुट लाबी- रुंदीची व ६ फुट उंच कढई तयार करण्यात येत असल्याची माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.राम हलवा तयार करून श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर नवा विक्रम स्थापित करणार आहे.
• पाकिस्थान- उद्धव ठाकरे एकमेकांसारखे
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना श्री बानवकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना १५० देशांनी नेता म्हणून मान्यता दिली. जी-२० च्या आयोजनातून भारताची शक्ती जगाला कळली. चीनमधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातून मोदीची प्रशंसा केली जात आहे. पाकिस्तान वगळता सर्वच देश मोदींची स्तुती करीत आहे. अशा वेळी पाकिस्थान आणि उद्धव ठाकरे हेच मोदींच्या कामाने आनंदी नाहीत. परंतु एक दिवस असा येईल ज्या दिवशी उद्धव ठाकरेही मोदींची स्तुती करतील. विकास म्हणजे काय हे कळण्यासाठी आणि टीका करण्यापूर्वी त्यांनी मुंबईत झालेला अटल सेतू उद्घाटनाचा कार्यक्रम पहायला हवा होता.
• शिल्लक राहिलेल्या सेना-राष्ट्रवादीची अवस्था गंभीर
उद्वव ठाकरे व शरद पवार यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या पक्षाची अवस्था गंभीर आहे. दोन्ही शिल्लक गटांना उमेदवार मिळत नसल्याने ही जागा याला सोड, ती जागा त्याला सोड अशी भूमिका घेत आहे. येत्या काळात मविआच्या घटक पक्षातून मोठे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट महायुतीच्या घटक पक्षात होतील. त्यामुळे त्यांना उमेदवारही मिळणार नाही.
• बाळासाहेबांची स्वप्नांची पूर्ती होतेय
प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत साकारत पूर्णत्वास जात असताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नांची पूर्तताही होत आहे. देवेंद्रजी यांच्यावर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाच्या वेळी काय करीत होते, असाही प्रश्न त्यांनी केला. ज्यांना अयोध्येला जाण्याचे निमंत्रण मिळाले आहे, त्यांनी अयोध्येला जावे. असे न करणारे हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत.
…………………….