Published On : Sat, Jan 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

हाती भगवे झेंडे , गुलालाची उधळण …मराठा समाजाचा आरक्षण लढा यशस्वी !

Advertisement

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला.

या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठे यश मिळाले आहे. सरकारचा अध्यादेश स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देणार आहेत.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परत येणार अशी घोषणा केली होती आणि आज अखेर ही घोषणा खरी ठरली .
मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातोरी डीजेच्या तालामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. गुलाल उधळला जातो पेढे वाटले जात आहेत आणि यामध्ये अख्खा गाव नाचताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, गावातील महिलासुद्धा या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाल्या आहेत.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या ‘या’ मागण्या केल्या मान्य –
– नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.
– राज्यभरात ५४ लाख नाही तर ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. याचा डेटा आम्हाला द्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली.

– शिंदे समिती रद्द करायची नाही, ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली. सरकारने दोन महिने मुदत वाढवली. तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

– सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही, अशी मनोज जरांगेंची मागणी होती, ती सरकारने मान्य केली.
– ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही, त्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचे आहे. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे. हे शपथपत्र १०० रुपयांना आहे. परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले.

– अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या, त्यासाठी गृहविभागाने पत्र द्यावे, अशी मनोज जरांगेंची मागणी होती. ती देखील मान्य करण्यात आली.

– मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही. जर भरती केलीच, तर आमच्या जागा राखीव ठेवा, अशी मागणी मनोज जरांगेंनी यांनी केली होती. ही मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे.
– क्युरेटिव पिटीशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी मान्य झाली.

Advertisement
Advertisement