नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी मोठी घोषणा करत 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कर भरावा लागणार नाही. वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही-
संरक्षण खर्चात 11.1% वाढ, आता तो GDP च्या 3.4% होईल. – आशा भगिनींनाही मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ. – तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल. दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
दरम्यान आज 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, कारण एप्रिल-मेमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कार्यकाळातील हा सहावा अर्थसंकल्प आहे.