Advertisement
नागपूर : यशोधरा नगर पोलिस स्टेशनशी संलग्न असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने (पीएसआय) आपल्या क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गोपाल गोंड असे मृत पोलिस उपनिरीक्षकाने नाव असून वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पीएसआय गोंड यांच्या क्वार्टरला भेट दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.