नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. आता त्यांनी घेतलेल्या राजकीय उखाण्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ‘देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वाण’ असं म्हणत अमृता फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
नागपुरात भारतीय जानता पक्षाचा महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून ‘विकासाचे वान’ हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. याच हळदी- कुंकूच्या कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.
देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वाण, आपण सर्वांनी ते स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण’, असा उखाणा घेत अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारांच्या महिलांसाठी असणाऱ्या अनेक योजना त्यांना समाजात सन्माने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिली, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.