नागपूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली. कोकण दौरा आटोपल्यावर उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक चिपळूण ते मुंबई असा प्रवास ‘वंदे भारत ट्रेन’ने केला. यावरून भाजपाने त्यांना धारेवर धरले.
यासंदर्भात भाजपाने अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली असून, उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी… वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास… तिसरी बार….. मोदी सरकार !, अशी पोस्ट भाजपाने एक्सवर केली आहे. तर उद्धव ठाकरे यांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास करतानाचा फोटोही शेअर केला.
भाजपने दुसऱ्या एका पोस्टमध्ये भाजपने म्हटले आहे की, हीच तर मोदींची गॅरंटी आहे. कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते. लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण, मोदी हैं तो मुमकीन हैं, अशी दुसरी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये दुसरा एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर आणि खासदार विनायक राऊत दिसत आहेत.