मुंबई :ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहीसरमध्ये गोळीबार करण्यात आला. मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केला. मॉरिसभाई याने अभिषेक घोसाळकर यांचा खून करत स्वतःही आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.घोसाळकर यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे.
माहितीनुसार, ही घटना दहिसर येथील आयसी कॉलनीतील मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी घडली. पोलिसांनी मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी रात्री ९ पासून ते शुक्रवारी पहाटे ४.३० पर्यंत पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण पुराव्यांचे संकलन केले. जवळपास ७.३० तास चाललेल्या या पंचनाम्यात पोलिसांना एक पिस्तूल, जिवंत काडतुस आणि सीसीटिव्ही फुटेज हस्तगत केले. तसेच या प्रकरणाला राजकीय वळण असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्या शरीरात २ बुलेट मिळाल्या आहेत. या प्रकरणात मुंबई पोलीस मेहुल नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. कारण घटनेच्या वेळेस मेहुल त्याठिकाणी हजर असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून रात्री ९ वाजेपासून सुरु असलेल्या पंचनामा ४.३० पर्यंत संपला. पोलिसांनी घटनास्थळी एक गण, काही बुलेट्स मिळवल्या आहेत. सकाळी ४.३० वाजेला पंचनामा संपल्यानंतर MHB कॉलनी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला.