नागपूर : राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले.
अशोक चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष होते. ही माहिती त्यांच्या प्रोफाईलला जोडण्यात आली होती. परंतु, आता काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांनी काँग्रेसचा उल्लेख काढला आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. आता अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण कोण कॉंग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार, या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.