Advertisement
नागपूर : आंघोळीसाठी गरम केलेले उकळते पाणी अंगावर पडून दीड वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माहितीनुसार, अजनी हद्दीतील प्लॉट नंबर ११, रमानगर, शताब्दी चौक येथील रहिवासी आशिष धारगावे यांचा एक दीड वर्षाचा रेहान घरात नेहमीप्रमाणे खेळत होता. त्याची आई घरकाम करत होती. दरम्यान त्याची आई गरम पाण्याचे पातेले घेऊन जात असताना अचानक तिच्या हातातील पातेले पडले.त्यातील गरम पाणी रेहानच्या अंगावर पडल्याने तो गंभीररित्या भाजला गेला.
रेहानला तातडीने उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेहानचे काका अतूल धारगावे यांनी दिलेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.