नागपूर :राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे.भाजपा शरद पवार गटाला आणखी एक धक्का देणार असेही बोललं जातं आहे. तसेच हे नाव दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून जयंत पाटील यांचे आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पाटील यांनी स्वतः मौन सोडले.
काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलेच आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येते. आपण यावर नंतर बोलू, असे म्हणत जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू सहकारी आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.तेव्हा जयंत पाटील रडलेही होते.
दरम्यान सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले. काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले. आता आज सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.