मुंबई -आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून १८ जागांवर दावा करण्यात आल्याचे दिसून येते. ठाकरे गटाकडून राज्यातील १८ मतदारसंघात निवडणूक समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक समन्वयकांची यादीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जाहीर केला.
मुंबईतील ४ मतदारसंघात आणि ठाण्यातील जागेवरही त्यांनी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. तर, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागांवरील मतदारसंघात निवडणूक समन्वयक नेमले आहेत.
त्याशिवाय कोकणातील रायगड तर प.महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि मावळ मतदारसंघातही समन्वयकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे, शिवसेनेने अप्रत्यक्षपणे १८ जागांवर दावा केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गट , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस तिन्ही पक्षांकडून जागावाटपासंदर्भात बैठका सुरु आहेत.