कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणा व त्याच्या गैरवापरासंदर्भात भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे भव्य स्मारक खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी ते बोलत होते.
सत्तेचा गैरवापर करून भाजपकडून झारखंड मधील आदिवासी मुख्यमंत्र्यांचा काहीच कारण नसताना त्यांच्यावर खोटे केसेस घालून तुरुंगात डांबले जात आहे.सरकारच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांविरोधात ईडी व अन्य संस्थांमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा,असे नारे दिले जात असून भाजपकडून असे चित्र तयार केले जात आहे. हा संघर्ष केवळ निवडणुकांपुरता सीमित नाही तर ज्यांच्या विरुद्ध अन्याय होतो त्यांच्या मागे मोठी शक्ती उभे करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे यासाठी सर्व प्रादेशिक शक्ती एकत्र आणल्या पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान या सोहळ्यास भाकपचे जनरल सेक्रेटरी खासदार डी. राजा, राज्याचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र कानगो, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, मेघा पानसरे तसेच कॉ. पानसरे अनुयायी उपस्थित होते.