नागपूर : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.नागपूरसह अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यात गारपीटीसह पावसाची शक्यता आहे.
येत्या २५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी मात्र हवामान कोरडे राहील. २५ फेब्रुवारीला राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणत नुकसान झाले.